धर्म
'धृ' ह्या संस्कृत धातुचा अर्थ आहे धारण करणे, आधार देणे, उचलून धरणे, टिकविणे, पालन करणे.
धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभिः इति।
जो मानवांना धारण करतो व पुण्यात्म्यांकडुन धारण केला जातो तोच धर्म. भारतीय तत्ववेत्यांनी तर धर्मं हा प्रथम पुरुषार्थ मानला आहे व त्याला अनुसरुनच अर्थ, काम, मोक्ष, आदि पुरुषार्थ करण्याची आद्न्या दिलेली आहे.
'धर्म' म्हणजे 'सहजता.' डोळ्यांनी बघणे हा डोळ्यांचा धर्म आहे. तो नाहीसा झाल्यास मला दुःख होते. हाताच्या बोटांची सहज (normal) हालचाल हा बोटांचा धर्म, हा नाहीसा झाल्यास म्हणजेच हालचाल थाम्बल्यास, वेदनायुक्त झाल्यास किंवा कंपवात झाल्यास मला दुःख होते.
या सर्व उदाहरणावरुन एक सिद्धांत लक्षात येतो, की धर्म नाहीसा झाल्यास किंवा विकृत झाल्यास मानवाला दुःख उत्पन्न होते.