Wednesday, May 26, 2010



........................वैशाख पौर्णिमा पूजन .................................

यंदाची वैशाख पौर्णिमा गुरुवार दिनांक २७ मे २०१० रोजी आहे. सदगुरु बापुनी पुढील प्रमाणे उपासना करायला सागितली आहे.

१) आपल्या सदगुरुंचा व हनुमंताचा फोटो समोर ठेवावा व दोन्ही फोटोना रुईचा पानांचा हार घालावा नंतर सदगुरुचा तारक मंत्र १०८ वेळा म्हणावा
|| ॐ मन: सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नाम: ||

२) त्यानंतर
|| श्री हनुमान चालीसा||
|| श्री पंचमुख हनुमान कवच ||
||श्री हनुमान स्र्तोत्र (भीमरूपी) ||
या पैकी कोणतेही एक स्त्रोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे

३) सदगुरु व हनुमंताला आब्यांची डाल व कैरीचे पन्हे यांचा नैवेद अर्पण करावा.

हे दोन्ही पदार्थ मानवाला त्रासदेणार्या षड रीपूंच्या गुनान्पासुन मुक्त आहेत, म्हणून त्या दिवशी तरी आपल्याला आसणारे काम, क्रोध, मत्सर, लोभ या षड पासून दूर राहण्यासाठी ही साधी सोपी उपाय उपासना आपण घरी बसून दिवसभरात केव्हाही करू शकतो.

.......................|| जय जय अनिरुद्ध हरी |...............................


No comments:

 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008