Monday, July 12, 2010

श्रीमद पुरुषार्थ: विजयते

श्रीमद पुरुषार्थ: विजयते


||श्री अनिरुद्धस्य प्रेम :, श्री अनिरुद्धस्य धर्म: ,

श्री अनिरुद्धस्य नियमा:, एते प्रकटित:श्रीमदपुरुषार्थ: ||

धर्म : ' ध्रु ' ह्या संस्कृत धातुचा अर्थ आहे, धारण करणे. आधार देणे , उचलून धरणे , टिकवणे,

पालन करणे .

जो मानवाना धारण करतो, व पुण्यात्मा कडून धारण केला जातो, तोच धर्म.


धर्म पुरुषार्थाची मूलभूत तत्वे :

१) सत्य , २) अस्तेय (चोरी न करणे) , ३) दया , ४) क्षमा , ५) दम ( मनाला अपवित्र विषयांचे चिंतन करू न देणे ), ६) अक्रोध , ७) दान , ८) आस्तिक्यबुद्धि, ९) श्रद्धा , १०) साधना, ११) अभ्यास १२) परोपकार ,१३) अहिंसा, १४) समबुद्धि ( सिद्धि व असिद्धिच्या वेळेस समबुद्धि )

सत्य प्रवेश - प्रमाण ५

आध्यात्मिक पुण्य कर्मे

१) श्रीमद पुरुषार्थाचे वाचन व मनन , २) नवविधा भकतिचे आचरण , ३) मंत्र पठन , ४) तीर्थयात्रा ५) भजनात सहभागी होणे , ६) भुकेल्याला अन्नदान , ७) १२ सूर्यनमस्कार घालणे ( कमीत कमी ) , ८ ) मौन ठेवणे , ९) मातृभूमि साठी त्याग करणे.

काम : ह्या विश्वात जेव्हा प्रथम मनोरूप बीज उत्पन्न जाले, तेव्हा त्या मनाच्या क्षेत्रात इच्छा उत्पन्न जाली. ही इच्छा म्हणजेच काम, हेच मनातील मूल उत्पादक बीज असते.

बेलगाम बेजवाबदार 'काम' हाच सर्व दू:खांचे मूल कारण असतो. म्हणुनच जीवन जगताना धर्माच्या क्षेत्रातच (शेतातच) "काम" पेरावा.. व भक्तिच्या गोफणीने त्याची राखण करावी.

अर्थ : जे जे ईछेले मनाने, ते ते प्राप्त करून घेण्याची साधने म्हणजेच अर्थ .

मोक्ष : ' मूच' (मोकले होणे, सुटने, सोडणे) ह्या मुळ संस्कृत धातु पासून मोक्ष शब्द बनतो .

भोगायतन शरीर, भोगायतन इन्द्रिये ,व भोगविषय पदार्थ ह्या तीन बंधनानी जीव स्वत:ला जखडून घेतो. ह्या तीनही बंधनांचा सर्वस्वी नाश होताच आत्म्याचे मुळ स्वतंत्र स्वरुप त्याला परत प्राप्त होते.

आत्मा व ब्रह्माचे एकत्व अनुभावास येते . व सुख दू:खाच्या पलीकडील शाश्वत आनंद प्राप्त होतो ..ही स्थिति म्हणजेच मोक्ष.

भक्ति : धर्मं , अर्थ ,काम, व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्रकटविणारे माध्यम म्हणजे ' भक्ति ' परमात्माशी असणारे भक्तीचे नाते जसजसे जीवात्मा दृढ़ करतो , त्या प्रमाणात जीवाची परमेश्वरा पासून जालेली विभक्ति कमी कमी होत जाते.

मर्यादा : कल्पना शक्तिला व क्रिया शक्तिला निरिक्षण शक्तिशी म्हणजेच वास्तवाशी बांधून ठेवणारी शक्ति म्हणजेच ' मर्यादा '

मर्यादा न पाळल्यासच रोग ( शारीरिक , मानसिक ,व आध्यात्मिक विकार ) व्यक्तीला किवा समाजाला पछाडतात.

' प्रदन्या पराधात रोग : '

म्हणुनच मर्यादा पुरुषार्थ मानवाला सर्वात जास्त आवश्यक आहे .मर्यादा पुरुषार्थापासूनच धर्मं पुरुषार्थ उत्पन्न होतो. व मग हाच धर्मं पुरुषार्थ काम , अर्थ , मोक्ष, व भक्ति ह्या तत्वांना पुरुषार्थाचे रूप देतो.

आपण स्वतः आहोत ह्याची जेव्हढी आपणास खात्री आहे, तेवढीच खात्री भगवंत आहे, अशी असणे म्हणजे मर्यादा मार्गाची वहीवाट .

तर भगवंत माझाच आहे, ह्याची तेवढीच खात्री असणे म्हणजेच "श्रीमद पुरुषार्थ".

" माझ्या लाडक्या मित्रांनो , हा मी तुमचा मित्र, सखा अनिरुद्ध स्वतःचे फक्त एकच जीवन कार्य मानतो, " सर्व विश्वात ह्या मर्यादा पुरुषार्थाची साधना व सिद्धी करून घेणे".

मर्यादा पुरुषार्थ शिकवणे व स्थापन करणे, हेच माझे ध्येय आहे. मर्यादा पुरुषार्थाच्या सिद्धते व स्थापनेशिवाय ह्या मर्यादा पुरुषोत्तमाचे राज्य, रामराज्य येऊ शकत नाही.

आणि म्हणूनच " मर्यादा पुरुषार्थ " रुजविणे, वाढविणे व त्याची जोपासना करिता करिता त्याची अमर्याद वाढ करणे, हा माझा सत्य संकल्प आहे.

No comments:

 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008