Wednesday, July 1, 2009

अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे पाच हजार गरजूंना कपडे व भांडय़ांचे वाटप

अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे पाच हजार गरजूंना कपडे भांडय़ांचे वाटप
वाडा, २८ जून/वार्ताहर

पुणे येथील सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने

खेड, मुळशी वेल्हे तालुक्यातील एक हजार कुटुंबातील सुमारे पाच हजार गरीब गरजूंना कपडे, भांडी वाटपकेले. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक प्रवीणसिंह वाघ यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कामगारआयुक्त दिनकर पगार यांच्या हस्ते विविध वस्तूंचे गावोगावी जाऊन गरिबांना वाटप केले.
खेड तालुक्यातील पूर्व भागातील जऊळके खुर्द, वाकळवाडी, वरुडे, जऊळके गावांची पठारवस्ती, टोकवाडी, जऊळके खुद्रुक आंबेगाव तालुक्यातील पेठ, पारगाव या सात गावांतील अनिरुद्ध बापू उपासना केंद्राच्यावतीने उपासकांनी भेटी देऊन गरीब लोकांची, मुलांची यादी केली.
या गावांसह परिसरात २०३ कुटुंबांतील १०९७ महिला, पुरुष, वयोवृद्धांसह लहान मुलांना कपडय़ांसह भांडी आणिलहान मुलांना खेळण्याचे साहित्य जागेवर जाऊन दिले.
जुनं ते सोनंयाप्रमाणे सद्गुरू अनिरुद्ध बापू उपासना केंद्र दरवर्षी विविध तालुक्यांतील गावांना भेटी देऊनस्तुत्य उपक्रम राबवून समाजातील गरीब, गरजू, कष्टकऱ्यांना कपडय़ांसह विविध वस्तूंचे जागेवर जाऊन वाटपकरीत आहेत.
गेली सात वर्षे हा उपक्रम राबवून दीन-दुबळ्यांना प्रत्यक्ष कोणतीही अपेक्षा ठेवता मदत करीत आहेत.

Information Taken From: http://www.loksatta.com/daily/20090629/pun14.htm
 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008