Sunday, August 29, 2010

मुंबईत 1 तारखेपासून पाणीकपात बंद

1 तारखेपासून मुंबईत 100 टक्के पाणीपुरवठा केला जाणार आहे. सण- उत्सवादरम्यान म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पाणीकपात केली जाणार नाही, असा निर्णय महापालिकेनं घेतलाय. महापालिका आयुक्तांनी ही घोषणा केलीय.

सप्टेंबर महिन्यात 100 टक्के पाणीपुरवठा केल्यानंतर पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. आणि त्यानंतर पाणीकपात सुरू करायची की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.
 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008