Tuesday, September 14, 2010

यूएस ओपन नदालनं जिंकलं

स्पॅनिश आर्माडा नदाल जिंकला. यूएस ओपनच्या फानलमध्ये त्यानं सर्बियाच्या नोवाक ज्योकोविचला पराभूत करून करियरच्या 9 व्या टायटलवर शिक्कामोर्तब केलं. राफेल नदालनं ज्योकोविचला 6-4, 5-7, 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभूत केलं.

पहिल्या सेटवर नदालनं नाव कोरल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ज्योकोविचनं पुनरागमन केलं खरं पण त्यानंतर नदालनं ज्योकोविचचं आव्हान मोडित काढत तिसरा आणि चौथा सेट आरामात जिंकला. राफेल नदालनं प्रथमच यूएस ओपनवर आपलं नाव कोरलंय.

रिलायन्स इन्फ्राचा सामान्यांना शॉक


मुंबईकरांच्या खिशाला लागणार आहे विजेचा झटका. कारण गेल्या पंधरा महिन्यांपासून लांबणीवर पडलेली उपनगरांतील रिलायन्स इन्फ्राची सरासरी सात टक्क्यांची दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे येत्या १५ सप्टेंबरनंतरची वीज बिले नवीन दराने येणार आहेत.

विशेष म्हणजे हाय टेन्शन च्या ग्राहकांना मात्र या दरवाढीच्या कचट्यातून वगळण्यात आलाय.इतकचं नाही तर ज्या निवासी ग्राहकांकडे हाय टेन्शनचं कनेक्शन आहे त्यांच्या दरामध्ये तब्बल अठरा टक्के कपात करण्यात आलीयय.

रिलायन्स इन्फाच्या या निर्णयाचा सगळ्याच जास्त फटका महिन्याला ५०० युनिट्स पेक्षा जास्त विज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना बसणार आहे.

याशिवाय प्रलंबित काळातील दर आकारणी आणि त्यावरील व्याज यांचा विचार पुढील दरप्रस्तावात केला जाणार आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीआधी राज्यसरकारने दरवाढीला आक्षेप घेतला. त्यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं जून-२००९ मध्ये स्थगिती वीज दरवाढीला दिली होती. पण आता आयोगाने दरवाढीवर असलेली स्थगिती उठवल्याने आता ''आर इन्फ्रा''च्या ग्राहकांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागेल.
 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008