Monday, November 23, 2009

Code Of Conduct (निश्चित मापदंड)
























(अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगस्ट २००९) : कुणीही 'आम्ही सदगुरुंचे लाडके आहोत, विश्वासू आहोत, श्रेष्ठ साधक आहोत' अश्या प्रकारे मिरवत असेल
, तर प्रत्येक श्रद्धावानाला त्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणी कुठल्याही अधिकारपदावर असेल स्वत: श्रेष्ठ साधक समजत असेल, तरीही त्याच्याकडे पुढील गोष्टी असणे अत्यावश्यक आहे, हा माझा ठाम सिद्धांत आहे.

१) आह्निक दररोज दोन वेळा करणे.
२) आह्निक, रामरक्षा, सदगुरूगायत्री(अनिरुद्ध-गायत्री मंत्र), सदगुरुचलिसा(अनिरुद्धचलीसा), हनुमानचालीसा व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.
३) बरोबरच्या व हाताखालच्या सहका-यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे. सहका-यांची किंवा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणा-या प्रत्येकाने 'आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.
५) बोलण्यापेक्षा, बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दॄष्टीने महत्वाचे आहे.
६) ह्या विश्वामध्ये कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करु शकत नाही' , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानू नये.
७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
८) चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे.
९) परपीडा कधीच करता कामा नये।


माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य यंत्रणा राबविले गेले पाहिजेत.
 
Visitor Number
Blog launched on 3rd December 2008